Monday, May 13, 2024
Homeखेळआज भव्य दहिहांडी

आज भव्य दहिहांडी

भारतीय जनता पार्टी चे आमदार विकास पुरुष दादाराव केचे तर्फे आयोजित आमदार चषक दहीहंडी उत्सव २०२३ यंदा भव्य स्वरूपात आज होणार आहे.आज दुपारी 1 वाजता गांधीचौक येथे आयोजीत करन्यात आले आहे. विजेता संघाला प्रथम पुरस्कार आमदार चषक व 100001/-रोख,द्वितीय पुरस्कार 50001/- रोख व अन्य गोविंदांना अनेक प्रोत्साहन पुरस्कार देन्यात येनार आहे..हा उत्सव गांधी चौक येथे होणार आहे.

 


डॉल्बीचा आवाज, तरुणाईचा जल्लोष आणि एक जबरदस्त थरार अनुभवण्यासाठी हे मैदान सज्ज झाले आहे. हा उत्सव साजरा होत असल्याने भाजप चे युवा कार्यकर्ते मोठ्या उत्साहात तयारीला लागले आहेत. संपूर्ण आर्वी शहरात या दहीहंडी उत्सवाचे बॅनर लागले असून यंदाचा हा दहीहंडी महोत्सव गांधी चौक येथे आज होणार आहे. कार्यकर्त्यांनी साफसफाई करून पूर्ण मैदान सज्ज केले आहे. या दहीहंडी उत्सवाला तालुक्यातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार याची खात्री कार्यकर्त्यांना असल्याने खबरदारी म्हणून योग्य नियोजनावर भर दिला आहे. यंदाची आमदार चषक दहीहंडी ही गर्दीचे सर्व रेकॉर्ड मोडणार, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या स्पर्धेविषयी अधिक माहिती हवी असल्यास रोषन पवार,अमीत शिंगाने,रवी गाडगे,मयुर पोकळे,प्रवीन पवार,नीतीन मेश्राम,लालु लायचा यांना संपर्क करण्याचे आवाहन केले आहे गोविंदाच्या सुरक्षिततेची पूर्ण जबाबदारी गोविंदा पथकाची राहील. पंचांचा निर्णय अंतिम राहील.
यावर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणार असून आपल्याकडील ग्रामीण भागातील गोविंदा पथकांना या दहीहंडी उत्सवात सहभागी होता यावे, त्यांना यातून आनंद, उत्साह, व आपले कौशल्य दाखविता यावे त्यातूनही अनेक नवीन गोविंदा पथके निर्माण होऊन त्यांना प्रोत्साहन व बक्षिसे मिळाविता यावीत या उद्देशाने आमदार दादाराव केचे दरवर्षी या गोविंदा पथकांसाठी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करतात.

अन्य बातम्या

Most Popular