Saturday, May 11, 2024
Homeखेळजिलास्तरीय बँडमिंटन स्पर्धेत गांधीविद्दालयाने मारली बाजी

जिलास्तरीय बँडमिंटन स्पर्धेत गांधीविद्दालयाने मारली बाजी

जिलास्तरीय बँडमिंटन स्पर्धेत गांधीविद्दालयाने मारली बाजी


स्थानिक नगर परिषद विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातील वय वर्ष 19 वयोगटाच्या आतील विद्यार्थ्यांनी आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी झालेल्या जिल्हास्तरीय बॅडमिंटन शालेय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला जिल्हास्तरीय मॅचेस या जिल्हा क्रीडा संकुल, वर्धा या ठिकाणी 12 सप्टेंबर रोजी घेण्यात आल्या. यामध्ये गांधी विद्यालयातील व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातील शिकत असलेल्या कश्यप लढे, नेहाल फुलझेले आणि कश्यप गायकवाड यांनी जिल्ह्यामधील विविध संघांना हरवून अंतिम सामन्यात प्रवेश केला. त्यानंतर भवन लॉयड्स येथील खेळाडूंसोबत त्यांचा अंतिम सामना झाला आणि त्यामध्ये नगरपरिषद महाविद्यालयातील खेळाडूंनी बाजी मारली या नंतर हा संघ जिल्ह्याचे नेतृत्व विभागीय स्तरावर करणार आहे .यासाठी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक रवी जाऊरकर त्यांचे पालक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी प्राचार्य उषाताई नागपुरे मॅडम यांनी मनापासून अभिनंदन आणि कौतुक केले

अन्य बातम्या

Most Popular