Sunday, April 28, 2024
Homeआंतरराष्ट्रीय*मॉडेल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात सायबर सुरक्षा कार्यशाळा संपन्न*

*मॉडेल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात सायबर सुरक्षा कार्यशाळा संपन्न*

मॉडेल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात सायबर सुरक्षा सायबर संपन्न

स्थानिक मॉडेल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये दिनांक 12.9.2023 ला सायबर सेल वर्ध्याच्या वतीने सायबर सुरक्षा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रविन होरे सर तर प्रमुख म्हणून सौ.अनुराधा काळे उपस्थित होत्या. याप्रसंगी सायबर सेल वर्धा टीमचे अंकित जिभे व स्मिता महाजन यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्हेगारी बाबत सखोल मार्गदर्शन केले. सायबर गुन्हेगार फिशिंग टेक्निक चा वापर अर्थात मासा गळाला लावणे या तंत्राचा वापर करतात. कोणताही गुन्हा आपल्या परवानगीशिवाय होऊ शकत नाही याबाबत अवगत केले. माहिती तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगामध्ये इंटरनेटचा वापर अत्यावश्यक झालेला असला तरी प्रत्येकाने दक्ष राहणे गरजेचे आहे. कोणत्याही प्रसंगी आपल्या बँक खात्याचे तपशील व ओटीपी इतरांना देऊ नये. आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना बँक कडून कधीही ओटीपी मागितल्या जात नाही. मात्र सायबर गुन्हेगार आपल्या खात्यामध्ये रक्कम जमा करायची आहे अशी बतावणी करून ओटीपी मागतात व प्रलोभनाला बळी पडून आपण ओटीपी दिल्यास आपल्या बँक खात्यातून रक्कम काढून घेतल्याचा मेसेज प्राप्त होतो. त्यानंतर ऑनलाईन गेम माध्यमातून देखील अशाप्रकारे फसवणूक केल्या जाते. सोशल मीडिया अकाउंट ,फेसबुक, व्हाट्सअप ,इंस्टाग्राम वर अनोळखी व्यक्तीच्या रिक्वेस्ट स्वीकारू नये. स्वीकारल्यास चॅटिंग करू नये. चॅटिंग केल्यास मोबाईल नंबर देऊ नये. आणि मोबाईल नंबर दिल्यास व्हिडिओ कॉल स्वीकारू नये. अन्यथा त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतील. याबाबत विद्यार्थ्यांनी स्वतः काळजी घ्यावी व इतरांना देखील जागरूक करावे असे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षीय भाषणातून प्रवीण होरे यांनी नागपूर शहरात ऑनलाइन गेम च्या माध्यमातून व्यापाऱ्यांची 20 कोटीची झालेली फसवणूक व अमरावतीतील डॉक्टरांची झालेली फसवणूक ही ताजी उदाहरणे विद्यार्थ्यांना सांगितली. आर्थिक फसवणुकीच्या बाबतीत तात्काळ 1930 या टोल फ्री क्रमांक वर संपर्क साधावा. तसेच मोबाईल चोरीच्या प्रकरणात ताबडतोब सी ई आय आर संपर्क करावा असे सुचित केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन दुर्गेश थातोडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

अन्य बातम्या

Most Popular