रसुलाबाद च्या सरपंचांचा सैनिक कल्याण विभाग मार्फत सत्कार
रसुलाबाद च्या सरपंचांचा सैनिक कल्याण विभाग मार्फत सत्कार
रसुलाबाद च्या सरपंचांचा सैनिक कल्याण विभाग मार्फत सत्कार

राजेश चंपतराव सावरकर सरपंच रसुलाबाद यांनी यांच्या कार्यकाळात गावाला *स्वच्छता ग्राम पुरस्कार, शाहू फुले आंबेडकर पुरस्कार, स्मार्ट ग्राम पुरस्कार, टीबी मुक्त ग्रामपंचायत पुरस्कार, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा पुरस्कार* हे पुरस्कार गावाला मिळून दिले. त्यांनी कोरोना काळात गावासाठी महत्वाची भूमिका निभावल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी त्यांच्या कामाची दखल घेत त्यांच्याशी जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत संवाद साधला होता. ते रुग्ण सेवक सुद्धा आहे, बरेच रुग्णांना रक्त दान करणे, हार्ट, कॅन्सर च्या रुग्णांना त्यांच्या डॉक्टर प्रशांत सावरकर यांच्या मदतीने AIIMS हॉस्पिटल मध्ये ट्रीटमेंट ऑपरेशन करता.
जिल्हा परिषद शाळेसाठी उल्लेखनीय कार्य म्हणजे जिल्हा परिषदची 1 ते 8 ची शाळा त्यांनी वर्ग 9 व 10 केली आणि ग्रामपंचायत हे इयत्ता 9 व 10 चे वर्ग हे ग्रामपंचायत चालवते.
हा सत्कार त्यांनी त्यांचा परिवार, त्यांच्या गावाकऱ्यांना, त्यांच्या गुरुजणांना समर्पित केला आहे.




