तेली समाजाच्या प्रलंबित समस्यां सोडवण्यासाठी प्राधान्य देणारआमदार सुमित वानखेडे यांचे प्रतिपादन*
तेली समाजाच्या प्रलंबित समस्यां सोडवण्यासाठी प्राधान्य देणार* *आमदार श्री सुमित वानखेडे यांचे प्रतिपादन* *संताजी सकल समिती आर्वी यांनी आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यात, समाज बांधवांना दिले आश्वासन

तेली समाजाच्या प्रलंबित समस्यां सोडवण्यासाठी प्राधान्य देणारआमदार सुमित वानखेडे यांचे प्रतिपादन
संताजी सकल समिती आर्वी यांनी आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यात, समाज बांधवांना दिले आश्वासन
मी आता जनता-जनतेच्या आशीर्वादाने, प्रचंड मताधिक्याने आमदार झालो,असुन जनतेच्या समस्या सोडविणे,हे माझे आद्य कर्तव्य आहेत. त्यासाठी मला विधानसभा निवडणुकीत तेली समाजाने भरघोस मदत करुन ,प्रचंड मताधिक्याने निवडणूकीत विजयी करण्यासाठी मोलाची भूमिका पार पाडुन मला मदत केली, त्या बद्दल मी संपूर्ण समाजाचा ऋणी असुन, सर्वाचे आभार मानतो. म्हणूनच समाजाच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी व त्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार आहेत, त्यासाठी मला थोडा कालावधी द्यावा, असे प्रतिपादन आर्वीचे विद्यमान आमदार सुमितभाऊ वानखेडे यांनी केले आहेत.
श्री संताजी सकल तेली समाज समिती आर्वी यांनी आयोजित केलेल्या भव्य सत्कार सोहळ्यात कार्यक्रमाचे प्रमुख सत्कारमुर्ती म्हणून ते व्यासपीठावर बोलत होते.
…यावेळी. व्यासपीठावर आर्वीचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर. वसंतराव गुल्हाणे, वर्धा जिल्हा निवडणूक प्रमुख तथा माजी उपजिल्हाधिकारी सुधीरभाऊ दिवे,माजी आमदार दादाराव केचे, मदत फांऊंडेशन चे अध्यक्ष श्री अनिलभाऊ. जोशी, माजी नगराध्यक्ष श्री प्रशांत सव्वालाखे, माजी नगराध्यक्ष श्रीमती लताताई तळेकर, कार्यक्रमाचे मुख्य आयोजक तथा माजी आरोग्य सभापती प्रकाश गुल्हाणे, डॉक्टर दिवाकर ठोंबरे, सामाजिक कार्यकर्ते राजेश काळबांडे इत्यादी मान्यवर व्यासपीठावर आवर्जून उपस्थित होते.
..कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुधीरभाऊ दिवे यांनी भाजपा पक्षात समाजाला न्याय मिळत असुन, तेली समाजाचे सर्वोच्च नेते या पक्षात असल्यामुळे समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी मी सुद्धा पोटतिडकीने पुढाकार घेईल, असे प्रतिपादन केले, भाजपाच्या पक्ष संघटना वाढीसाठी समाजाची अनन्यसाधारण भूमिका आहेत, असेही दिवे यांनी सांगितले. तसेच आर्वीचे माजी आमदार दादाराव केचे यांनी मी भारतीय जनता पक्षाचा आमदार असतांना समाजाला झुकते माप देऊन समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी मोठा हातभार लावला असुन पंचायत समिती आर्वी व नगर पालिकेच्या निवडुकीत समाजाला नगराध्यक्ष व पंचायत समिती मध्ये सभापती पद दिले, असेही सांगितले. त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर वसंतराव गुल्हाणे यांनी समाजाच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी आमदार श्री सुमित वानखेडे यांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन करुन, सुमितभाऊ हे व्यक्तीमत्व अजातशत्रू व विकासाचा महामेरू आहेत, असेही सांगितले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ,स्वाती प्रकाश गुल्हाणे, तर संपूर्ण कार्यक्रमाचे ओघवते सूत्रसंचालन अरून म.कहारे,यांनी तर आभार प्रदर्शन प्रकाश आ.गुल्हाणे यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अरुण कहारे, सामाजिक कार्यकर्ते अविनाश ल टाके, प्राध्यापक सुरेन्द्र मु.गोठाणे, समाजसेवक ज्ञानेश्वर आसोले, प्रविण बिजवे, प्रमोद गाठे, गजेंद्र गिरोळकर,शुभांगी गाठे,गणेश देऊळकर,मनोज गुल्हाणे, सौरभ गुल्हाणे, विवेक कहारे, अनुप खुणे,स्वाती गुल्हाणे, माधवी शिरभाते, सुनिता कहारे, मंजुषा टाके, वैशाली बिजवे इत्यादींनी केली. यावेळी सत्कार सोहळ्यात आमदार सुमितभाऊ वानखेडे यांच्या अर्धागिंनी सौ.क्षितीजाताई वानखेडे यांचा व्यासपीठावर समाज बांधवांनी व विशेषतः महिलांनी वाढदिवस साजरा करुन, कार्यक्रमाची शोभा वाढविली.यावेळी समाज बांधवांनी प्रचंड गर्दी केली होती. तसेच आमदारांच्या भेटीसाठी अनेक समाज बांधव चातकासारखी वाट पाहत होते, हे वैशिष्ट्यपूर्ण म्हणावे लागेल.