राज्य

पिंपळखुटा परिसरात सततच्या पावसाने पिके पिवळी पडली*.

पिंपळखुटा परिसरात सततच्या पावसाने पिके पिवळी पडली पाणथळ जमिनीतील सोयाबीन व कपाशीचे पूर्णता नुकसान

पिंपळखुटा परिसरात सततच्या पावसाने पिके पिवळी पडली
पाणथळ जमिनीतील
सोयाबीन व कपाशीचे पूर्णता नुकसान

पिंपळखुटा व परिसरातील शेतजमीन ही हलक्या प्रतीची असल्याने तसेच काही जमीन ही पाणथळ असल्याने कित्येक दिवसापासून सुरू असलेल्या  पावसामुळे संपूर्ण सोयाबीन व कपाशीचे पिके जमीनदोस्त झाली असून परिसरातील शेतकरी पूर्णतः हतबल झालेला आहे. पिंपळखुटा येथील शेतकरी अनिल देवगडे यांच्याकडे तीन एकर शेती असून त्यांनी कपाशीची लागवड केली होती. खर्च सुद्धा भरपूर केला होता. सततच्या पावसाने डवरणी खुरपणी करता येत नसल्याने तीन ते चार वेळा तणनाशक काची फवारणी सुद्धा केलेली होती. परंतु तीन एकरावर 60 ते 70 हजार रुपये खर्च करून सुद्धा आज सततच्या पावसामुळे पिकाची दुरावस्था झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे सदर
शेतकरी पूर्णतः हतबल झालेला असून लागलेला खर्च तर सोडा पण पिकाची परिस्थिती पाहून कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आलेली आहे. आत्महत्या कराव की काय अशा प्रकारचे विचार शेतकऱ्यांच्या मनात येत आहे. परिसरातील शेत जमीन हलक्या प्रतीची व पानथळ असल्याने शेतकरी पूर्णता हतबल झालेला आहे. तेव्हा शासनाने परिसरातील संपूर्ण शेत जमिनीचा सर्वे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी अनिल देवगडे यांचे सह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button