आर्वीत एका रात्रीत नेहरू मार्केट येथील 12 दुकानाचे शटर उचकटून (तोडून) चोरी
आर्वीत एका रात्रीत नेहरू मार्केट येथील 12 दुकानाचे शटर उचकटून (तोडून) चोरी

आर्वी शहरातील मुख्य नेहरू मार्केट येथील बारा दुकानाचे कुलूप न तोडता शटर उचकटून चोरट्यांनी दुकानातील कोणतेही सामान न नेता रोख रक्क लंपास केला. या ऐतिहासिक चोरीला पोलीस द्वारे गस्त न केल्यामुळे झाल्याचा आरोप स्थानिक व्यापाऱ्यांनी केला आहे. यापूर्वी आर्वी शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात दुकान फुटले नाही. दुकानेफुटल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. याबाबत आर्वी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती नेहरू मार्केट मधील व्यावसायिक नितीन जयसिंगपूरे पहाटे आपले हॉटेल खोलण्याकरिता आले असता त्यांना समोरील तीन-चार दुकानाचे शटर फोडले दिसली असता त्यांनी त्या दुकानदारांना फोनवर माहिती देऊन बोलविले.

याबाबत व्यापारी संघटना द्वारे दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे दीड वाजता ते दोन वाजताच्या सुमारास सीसीटीव्ही मध्ये दिसलेल्या पाच चोरटे हाताने शटर उचकटून चोरी करत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. त्यांनी नेहरू मार्केट येथील तब्बल 12 दुकानाचे शटर उचकटून चोरी केली व एका दुकानाचे शटर उचकटण्याचे प्रयत्न केले त्यामध्ये , किराणा दुकान, जनरल स्टोअर्स व तंबाखू दुकान आदींचा समावेश आहे. नेहरू मार्केट मधील हरी ओम किराणा, जेठानंद गोकुळदास लालवानी किराणा ,संजय ट्रेडर्स, प्रकाश आत्मारामजी गुल्हाने किराणा, कृष्णा किराणा ,राजू किराणा, जयश्री किराणा, ताजदार किराणा, लक्ष्मी कलेक्शन, लक्ष्मी किराणा, धणपतलालजी टावरी किराणा,संजय ट्रेडर्स या दुकानाचा समावेश असूनआदी किराणा चे शटर फोडण्याचे प्रयत्न केले.
दुकाने फोडल्यानंतर त्यातील रोख रक्कम व सिगरेट पाकीट घेऊन हे चोरटे फरार होत असल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. या चोरट्यांनी काही ठिकाणी तोंडावर मास्क लावल्याचे दिसत असून, एक दुकान फोडल्यानंतर काही अंतर पुढे गेल्यावर लगेच दुसरे दुकान फोडत होते. रोख रक्कम आणि इतर वस्तू चोरीबरोबरच दुकानाचे शटर तोडल्याने दुकानदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एवढ्या चोरी होऊनही रात्रपाळीवरील पोलिस नेमके काय करत आहेत, असा प्रश्न नागरिक व व्यापाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
या प्रकारामुळे परिसरातील व्यवसायिकांचे धाबे दणाणले असून, या प्रकाराला त्वरित आळा घालावा, अशी मागणी करण्यात येत आहे.




