निंबोली शेंडे येथे आमदार दादाराव केचे यांचे भव्य सत्कार
निंबोली शेंडे येथे आमदार दादाराव केचे यांचे भव्य सत्कार
निंबोली शेंडे येथे आमदार दादाराव केचे यांचे भव्य सत्कार

आर्वी तालुक्यातील निंबोली (शेंडे) येथील ग्रामवासियांनी विकास पुरुष आमदार दादाराव केचे यांचा आयोजित सत्कार कार्यक्रमात भव्य सत्कार करण्यात आला.
ग्रामवासियांकडून सत्कार स्वीकार करून सर्वांचे आमदार दादाराव केचे यांनी आभार मानले.
आर्वी विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार दादाराव केचे हे नेहमीच विकास कामांमुळे चर्चेत असतात त्या सोबत जनतेचे व्यक्तीगत कामे तसेच त्यांच्या सुख दुखात सदैव व्यक्तिशः समाविष्ट असतात. रोज सकाळी असणाऱ्या जनता दरबारात जनतेची अनेक कामे मार्गी लावण्यासाठी दररोज प्रयत्नशील असतात याची प्रचिती विधानसभेतील असंख्य नागरिकांना आली आहे.

काहींची जनता दरबारात आमदारांची भेट होऊ शकली नाही तर कामानिमित्त ते जिथे असतील तेथेच जनतेची कामे विनाविलंब पुर्ण करून देतात. इतकेच काय तर सकाळी दिनचर्या आटपून दररोज संपूर्ण आर्वी स्कुटीने पिंजून काढतांना ते दिसतात आणि दरम्यान भेटणाऱ्या व्यक्तींची आपुलकीने विचारपूस करतांना ते दिसतातच. याच बरोबर काही अपरित घटना अथवा नागरिकांना समस्या असल्यास तर त्या बाबतीत इतंबूत माहिती घेत योग्य मार्ग काढतांना आमदार दादाराव केचे दिसतात.
आमदार असुनही सर्वसामान्य नागरिकांना आपल्या पदाचा कधीही गर्व दाखवून अहमपणाचा आव न आणतांना जनते प्रती समर्पित कार्य कर्तव्यदक्षतेने करण्यात अग्रेसर असल्याने त्यांची लोकप्रियता शिखरावर आहे. महाराष्ट्रात अनेक आमदार असे झाले किंवा सद्यस्थितीत आहेत कि ज्यांच दर्शन क्वचितच जनतेला होते. त्यामुळे आमदार, खासदार गावत आले किंवा दिसले तरी लोक ‘निवडणुका लागल्या वाटतं?’ असा प्रश्नार्थक विचार करता करता बहुधा म्हण प्रचिलीत झाली असावी. पण विचार अथवा म्हणीला छेद देण्याचे काम आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार दादाराव केचे यांनी दिली आहे
आयोजित कार्यक्रमात निंबोली शेंडे येथील नागरिकांनी आमदार दादाराव केजी यांना निंबोली (शेंडे) जुने गांव येथील २ किमी रस्त्याचे डांबरीकरण करण्याबाबत, निंबोली (शेंडे) पुर्नवसन येथील रस्त्याचे डांबरीकरण करण्यावावत,निंबोली (शेंडे) पुर्नवसन येथील बेघरांना प्लॉट मिळण्याबाबत,निंबोली (शेंडे) पुर्नवसन येथील उर्वरीत लोकांना घरकुल मिळण्याबाबत लिखित निवेदन सुद्धा दिले.
यावेळी धर्मेंद्रजी राऊत,विनयजी डोळे, धिरेंद्र शेंडे, अरुणभाऊ गेडाम,मनीष उभाडं, सरेंद्र धुर्वे (सरपंच) मांडला, अमित शेंडे, राजाभाऊ शेंडे, सुधीर शेंडे,हर्षल शेंडे,सुभाषराव शेंडे, मनोज शेंडे, त्रेंबकराव शेंडे,राजाभाऊ भगत, सचिन हर्सूलकार, दामोदर वराडे,राजू भगत, संजय कोकरडे, मंगेश कुंभारे व समस्त ग्रामवासी व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता बंधूची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.




