स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा स्वबळाचा नारा…..

आर्वी विधानसभा क्षेत्रातील नगरपरिष व आर्वी,आष्टी,करांजा या तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील जागा स्वबळावर लढण्याचा निर्णय सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आर्वी येथील विश्रामगृहामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर करण्यात आला. प्रामुख्याने आर्वी नगरपरिषद मधील 25 उमेदवार तथा नगराध्यक्ष पदाचे एक उमेदवार त्याचप्रमाणे आर्वी आष्टी कारंजा या तालुक्यातील तेरा जिल्हा परिषद व 26 पंचायत समिती मधील उमेदवार यांची यादी जिल्हा सहसंपर्क प्रमुख मा.श्री सीतारामजी भुते साहेब, जिल्हा प्रमुख आशिषजी पांडे, युवासेना जिल्हा प्रमुख महेशजी चौधरी व मा.श्री. प्रदीप काळे शिवसेना नेते आर्वी विधानसभा क्षेत्र यांच्या उपस्थितीत देण्यात आली खालील मुद्द्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आर्वी नगर परिषदेचे निवडणूक लढवणार आहे एक आर्वी नगरपरिषद यांच्या मालकीच्या व रिकाम्या असलेल्या जागांवर स्थानिक बेरोजगार युवकांना काम मिळण्यासाठी व्यापार संकुल उभे करण्यात प्रारंभ देण्यात येईल. जुने पद्धतीने शंभर टक्के वाढवलेला मालमत्ता कर पूर्वस्थितीत करण्यात येईल.
मुद्दा क्रमांक तीन जीवन प्राधिकरणाकडे असलेल्या अनियमित पाणीपुरवठा नगर परिषदेकडे हस्तांतर करून नियमितपणे शुद्ध पाणीपुरवठा करण्यात येईल.
मुद्दा क्रमांक चार आतापर्यंत करोडो रुपये खर्च करून न सुटलेला घनकचरा विल्हेवाटीचा प्रश्न प्रामुख्याने सोडवण्यात येईल व विशेषता महिलांसाठी स्वच्छतागृहाची निर्मिती करून वर्षाने वर्षाचा प्रश्न मागणी लावण्यात येईल.
मुद्दा क्रमांक पाच उद्यानासाठी सोडलेल्या जागांची दुरावस्था दूर करून छोट्या मुलांना खेळण्याची व्यवस्था व बुद्धांना विरंग याची सोय करण्यात यावी येईल या व इतर प्रमुख मुद्द्यांवर येणारी परिषदेचे निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष लढवेल या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले प्रमुख पदाधिकारी खालील प्रमाणे आहेत.
आज दिनांक ३१/१०/२५ आर्वी विश्राम गृह येथे स्थानिक स्वराज्य निवडणुकी संदर्भत संघटन बांधणी तसेच निवडणूकीची पूर्वतय्यारी विषयी आर्वी विधानसभा च्या वतीने बैठक तसेच पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी सहसपंर्क प्रमुख सिताराजी भुते, वर्धा जिल्हा प्रमुख आशिष पांडे, युवासेना जिल्हाधिकारी महेश चौधरी,विधानसभा प्रमुख नानक्सिंग बावरी, विधानसभा समन्वयक सनी गौतम, आर्वी विधानसभा चे प्रदीप जी काळे, तालुका प्रमुख गुड्डू गावडे, अनिल गुरुव, ललित वंजारी, महिला आघाडी जिल्हा संघटिका संगीता कडू यांच्या उपस्थितीत पार पडली बैठकीत पदाधिकारी यांना सर्व प्रथम पक्ष संघटन बांधणी वर भर देण्याचे सांगण्यात आले तसेच येणारी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आपले जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडणून आणता येइल ते स्थानिक मुद्दे हाताशी धरून विरोधकांना कसे पारस्त करता येइल याची आखनी करण्यात आली बैठकी नंतर आर्वी विधानसभा च्या वतीने पत्रकार परिषद वर्धा जिल्हा प्रमुख आशिष पांडे, सहसपर्क प्रमुख सीतारामजी भुते यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली पत्रकारांसमोर आर्वी शहरतील स्थनिक मुद्दे, मागील सत्ताधारी यांनी आर्वी शहरात केलेला भ्रष्टाचार जनते समोर आणून युवा वर्गाला निवडणुकीत प्राधान्य देऊ आणि येणारी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वबाळवर लढू असे सांगण्यात आले यावेळीविपुल चौधरी युवा सेना जिल्हा समन्वयक वर्धा कारंजा मनीष अरसड आर्वी शहर प्रमुख शक्ती सिंग टाक उपतालुकाप्रमुख कारंजा अनिल देशमुख माजी शहर प्रमुख आष्टी कारंजा सर्वेश देशपांडे शिव कुंभारे अभय ढोले मिलिंद लंगडे विनायक हेडावू माझी आष्टी संघटक छगन खोडकर रमेश मडामे शैलेश मदने मुरली पवार. उपस्थित होते.




