आमदार सुमित वानखेडे यांनी दिलेला शब्द पाळला
आमदार सुमित वानखेडे यांनी दिलेला शब्द पाळला आर्वी विधानसभा क्षेत्रातील आठ हजार घरकुल मंजूर
आमदार सुमित वानखेडे यांनी दिलेला शब्द पाळला
आर्वी विधानसभा क्षेत्रातील आठ हजार घरकुल मंजूर

आर्वी विधानसभा निवडणूक रिंगणात सुमित वानखेडे उमेदवार असताना त्यांनी आर्वी तालुक्यातील नागरिकांना शब्द दिला होता की पीएम योजनेअंतर्गत घरकुल करिता मंजुरी आणणार. गरजू नागरिकांना घरकुल नक्कीच मिळेल. आपण मला मत द्या मला निवडून द्या आपला दिलेला मत वाया जाणार नाही.
आर्वी तालुक्यातील नागरिकांनी विश्वास ठेवून, आर्वी विधानसभा क्षेत्राचा विकास होईल, आर्वी विधानसभा क्षेत्रातील समस्या दूर होतील हाच विश्वास ठेवून सुमित वानखेडे यांना प्रचंड बहुमताने निवडून दिले .आर्वी विधानसभा चे आमदार होताच त्यांनी आर्वी विधानसभा क्षेत्रातील अनेक कामांना मंजुरी मिळवून दिली त्यातच महत्वाचे पीएम योजनेअंतर्गत आठ हजार घरकुलांना मंजुरी आणून दीली. व उरलेल्या घरकुलांना ही लवकरच मंजुरी मिळणार असे शब्द दिले.
प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांची आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यातील अनेक गरजू नागरिकांना गरज होती. आर्वी,आष्टी, कारंजा तालुक्यातील नागरिकांनी आमदार सुमित वानखेडे यांना निवेदने सुद्धा दिले होती. आमदार सुमित वानखेडे यांनी घरकुल मंजुरी करिता पाठपुरावा केला व मंजुरी मिळवून दिली.
आर्वी तालुक्यात २,१३४, कारंजा ३००२ तर आष्टी तालुक्यात २,७३० घरकुल मंजूर करून आणले. आवास योजनेतील 90% यादी निकाली निघाले असल्याची माहिती आमदार सुमित वानखेडे यांनी दिली. आर्वी विधानसभा क्षेत्रातील आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यातील नागरिकांना घरकुल मिळाल्याने त्यांनी आमदार सुमित वानखेडे यांचे आभार मानले. व आमदार सुमित वानखेडे यांनी ही योजना आपल्या मतदारसंघात यशस्वी करून दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.




