दीपज्योत रंगोत्सव २०२५” पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला
दीपज्योत रंगोत्सव २०२५” पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला
“दीपज्योत रंगोत्सव २०२५” पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला

दिवाळी निमित्त आयोजित “दीपज्योत रंगोत्सव २०२५” या ऑनलाईन रंगोली स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. तब्बल ६०० हून अधिक सहभागींचा सहभाग लाभलेल्या या उपक्रमात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आ. सुमित दादा वानखेडे (आर्वी विधानसभा आमदार), मा. प्रशांत भाऊ सव्वालाखे (माजी नगराध्यक्ष), मा. मनोज दादा आगरकर (श्री संताजी अखिल तेली समाज संघटन युवा आघाडी अध्यक्ष), सौ. पूनम ताई दीपकराव तरोने केने (परीक्षिका), सौ. साधना ताई दिलीप आजमिरे (समाजिक कार्यकर्त्या), सौ. संगीता मोरे (शैक्षणिक कलाक्षेत्रात उत्तम स्थान), अर्सलान खान साहेब, सुधीरजी जाचक व शेख रमजान शेख अमीर (समाजिक कार्यकर्ते) हे मान्यवर उपस्थित होते.

“कलेचा सन्मान, एकतेचा अभिमान — रंगोलीतून सजलेला सृजनोत्सव” या घोषवाक्याने दीपज्योत रंगोत्सवाने यंदाही सर्वांच्या मनात सृजनतेचा उजाळा दिला.




