सरपंच्यांना सुरक्षा कायदा असावा जिल्हा सरपंच संघटनेचे माननीय तहसीलदार साहेब आर्वी यांचेमार्फत मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन
आर्वी
सुरक्षा कायदा असावा जिल्हा सरपंच संघटनेचे माननीय तहसीलदार साहेब आर्वी यांचेमार्फत मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन

आज दिनांक ९/१/२५ रोज गुरुवार ला जिल्हा सरपंच संघटना च्या माध्यमातून निवेदन देण्यात आले की नुकतेच मसाजोग जिल्हा बीड येथील संतोष देशमुख या निहत्या व होनहार सरपंचावर झालेला भीषण. भयावह. हमल्याच्या अनुषंगाने ज्या पद्धतीने निर्गुण. निर्दयी .निष्ठुर. पद्धतीने हत्या करण्यात आली त्याने राज्यात मोठी खळबळ उडाली. संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला अशा परिस्थितीमध्ये सरपंचांना गावांमध्ये किंवा सर्कलमध्ये तालुका पातळीवर काम करणे कठीण होऊन बसले. गावात काम करत असताना काम चांगलें किंवा वाईट बरोबर की चूक हे न पाहता संघर्ष हा अटळ असते आणि तो नियमित सुरू असतो. त्या अनुषंगाने राज्यात आज सरपंच महोदयांना सुरक्षा कायद्याचे कवच असणे ही अत्यंत महत्त्वाची बाब बनली आहे. तसेच प्रत्येक ग्रामसभेला पोलीस संरक्षण अनिवार्य करणे हे.सुद्धा आवश्यक आहे. सरपंचाला विमा संरक्षण देण्यात यावे. विद्यमान उद्भवलेल्या परिस्थितीच्या अनुषंगाने पेन्शन लागू करण्यात यावे ग्रामसभा सर्व ग्रामवासीयासाठी असल्याने मासिक सभेला इतरांना ग्रामपंचायतीत येणे कायद्याने प्रतिबंधित करण्यात यावे अशा विविध मागण्यांच्या निमित्याने निवेदन देण्यात आले तप्रसंगी सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रा. धर्मेंद्र राऊत. बाळासाहेब बोके तालुका अध्यक्ष. राजेंद्र शिरगरे .सचिन दहाट. शैलेश तलवारे.ज्ञानेश्वर राठोड उपस्थित होते



