राज्य

*सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय आर्वी येथे वाचन संकल्प महाराष्ट्राचा या कार्यक्रमाचे आयोजन*

*सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय आर्वी येथे वाचन संकल्प महाराष्ट्राचा या कार्यक्रमाचे आयोजन

आर्वी

सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय आर्वी येथे वाचन संकल्प महाराष्ट्राचा या कार्यक्रमाचे आयोजन

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत वाचन संवाद कार्यक्रम सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय कन्नमवार नगर आर्वी येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. प्रवीण काळे तर समाजसेविका व आदिवासी गोंडी या बोली भाषेच्या जाणकार  यशोदाताई व्यंकटेश आत्राम, गझलकार व कवी प्रकाश बनसोड, गझलकार विद्यानंद हाडके, शारदा निलेश मून, विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर 133 वी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुजित दादा भिवगडे ग्रंथालयाचे कोषाध्यक्ष भानुदासजी फुसाटे इत्यादी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
लेखक व वाचक यांच्यात संवाद घडून यावा व वाचनाचे महत्त्व जीवनाला आकार देण्यासाठी किती महत्त्वाचे आहे याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपल्या विचारातून समजावून सांगितले.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने वाचन संस्कृती विकसित व्हावी व ग्रंथालयीन चळवळ समृद्ध व्हावी यासाठी एक जानेवारी ते 15 जानेवारी या पंधरवड्यात वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम सर्व शासनमान्य वाचनालयात सुरू करण्यात आलेला आहे. यात ग्रंथ प्रदर्शनी वाचन कौशल्य कार्यशाळा सामूहिक वाचन प्रकल्प पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धा इत्यादी कार्यक्रम यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेले आहे.
सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय येथे ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते या प्रदर्शनीला अनेक विद्यार्थी अभ्यासकांनी भेट दिली.
विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 133 वी जयंती उत्सव समिती आर्वी तर्फे व सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालयातर्फे  वन विभाग आर्वी येथे कार्यरत असणाऱ्या शारदा निलेश मून शाल व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आयोजन मानवतेचे प्रचारक या कवितासंग्रहाचे कवी व ग्रंथपाल सुरेश भिवगडे यांनी केले.
या कार्यक्रमाला ग्रंथालयातील विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button