कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आर्वीच्या विद्यार्थ्यांची विधानभवनाला भेट…
*कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आर्वीच्या विद्यार्थ्यांची विधानभवनाला भेट
कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आर्वीच्या विद्यार्थ्यांची विधानभवनाला भेट…

आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी प्रसिद्ध असणाऱ्या आर्वी येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशन २०२४ ला भेट दिली व प्रत्यक्ष कामकाजाची पाहणी केली.
कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आर्वी येथील विद्यार्थ्यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशन २०२४ ला भेट दिली व प्रत्यक्ष कामकाज पाहणी करून उपस्थित नेत्यांकडून मार्गदर्शन घेतले. या भेटीमध्ये महाविद्यालयातर्फे ३९ विद्यार्थी व ८ प्राध्यापक भेटीसाठी पाचारण करण्यात आले होते. यादरम्यान विद्यार्थ्यांनी प्रेक्षक दालनात बसून प्रत्यक्ष विधानसभा व विधानपरिषद या दोन्ही सभागृहांचे कामकाज बघितले. विधानसभेमध्ये होणारा प्रश्नोत्तराचा तास, वेगवेगळ्या विषयांवर होणारी चर्चा हे निवळ पुस्तकामध्येच वाचले होते. मात्र आज प्रत्यक्ष विधानसभा व विधानपरिषद कामकाज विद्यार्थ्यांनी बघितले त्यामुळे त्यांच्या ज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणात भर पडली. पुस्तके ज्ञान सोबतच, प्रत्यक्ष अनुभव यामुळे कुठेतरी आमच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या असे मत यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. सोबतच यादरम्यान विद्यार्थ्यांनी दिक्षाभूमी व रमन विज्ञान केंद्र येथे देखील भेट दिली.
या भेटीदरम्यान मंत्री श्री चंद्रकांतदादा पाटील, मंत्री श्री गिरिषजी महाजन, माजी केंद्रीय मंत्री श्री रावसाहेब दानवे, आमदार श्री प्रविणजी दरेकर, प्रा.राम शिंदे, मंत्री श्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री श्री बाळासाहेब विखे पाटील, मंत्री श्री नरहरी झिरवाळ, राज्यमंत्री श्री पंकजजी भोयर, स्थानिक आमदार श्री सुमितजी वानखेडे, सोबतच आर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री संदीपजी काळे यांची भेट झाली. त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला व विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर दिले. विधानसभा व विधानपरिषद पुस्तकातच शिकल्याने आज प्रत्यक्ष कामकाजाची पाहणी झाली त्यामुळे जे आपण टीव्हीतच बघतो हे प्रत्यक्ष बघितल्याने वेगळी अनुभुती सर्व विद्यार्थ्यांना आल्याची प्रतिक्रिया यावेळी राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.आशिष पेठे यांनी दिली. यावेळी त्यांच्यासमवेत कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्रा.धर्मेंद्र राऊत, डॉ.भावना माळोदे, वाणिज्य विभागप्रमुख डॉ संजय धनविजय, राज्यशास्त्र विभागाचे प्रा.अमर भोगे,प्रा.नितीन दिघडे, प्रा.पल्लवी गिरडकर, वाणिज्य विभागाचे डॉ.शितल भार्गव,प्रा.दर्शनकुमार चांभारे,प्रा.तृषाली खोडे, प्रा.देवेंद्र उईके, प्रा.तनुज काळे उपस्थित होते.



